बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरची फॅशन इतक्या वर्षांनंतरही फिकी पडलीय, असं कधीच पाहायला मिळालं नाही.
ही अभिनेत्री आपल्या स्टाइलनं नेहमीच लोकांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरते.
म्हणूनच एखादी पार्टी असो किंवा इव्हेंट, फॅशनच्या बाबतीत ती बहीण करीना कपूरलाही तगडी टक्कर देते.
48 वर्षांच्या लोलोचा फॅशन सेंस इतका निराळा आहे की जितकी क्लासी ती वेस्टर्न आउटफिट्समध्ये दिसते, तितकीच सुंदर पारंपरिक पेहरावामध्येही दिसते.
करिश्माचा मोहक लुक करीनाच्या पारंपरिक लुकवरही भारी पडल्याचं अनेकवेळा पाहायला मिळतं.
नव्वदच्या दशकांत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूर हिचं नाव घेतलं जातं. आजही करिश्माची जादू तसूभरही कमी झालेली नाही.
आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहोचलेली करिश्मा कपूर आपल्या लूक्सनी आणि फॅशनने चाहत्यांना घायाळ करत असते.
करिश्मा सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते.