आपल्या सुमधूर आवाजाने तरुणाईला मोहून टाकणाऱ्या गायकांपैकी महत्वाचं नाव म्हणजे केतकी माटेगावकर.
२०१५ ला आलेल्या टाईमपास २ सिनेमाने सर्वांना भुरळ घातली आहे.
केतकीचे चाहते तिच्या नव्या सिनेमाची वाट बघत आहेत.
केतकी माटेगावकर 'मीरा' या आगामी मराठी सिनेमात झळकणार आहे.
केतकी माटेगावकर तिच्या अभिनयाने आणि गायनाने गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्री गाजवत आहे.
सा रे ग म प लिटिल चॅम्प्स च्या माध्यमातून केतकीने अगदी लहान वयात तिच्या सुरांची जादू दाखवली.
पुढे केतकीने सुजय डहाके यांच्या 'शाळा' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.