सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा पगार किती? - Dhananjaya Y. Chandrachud

| Sakal

भारताचे सर्वोच्च न्यायालय ही भारतातील सर्वोच्च न्यायिक संस्था आहे आणि भारतीय प्रजासत्ताकाचे संविधानाअंतर्गत सर्वोच्च न्यायालय आहे. 

| Sakal

भारताचे सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि मुख्य न्यायमूर्ती आहेत.

| Sakal

सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आहेत.

| Sakal

सरन्यायाधीश यूयू लळीत यांच्या निवृत्तीनंतर, न्यायमूर्ती चंद्रचूड हे भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून काम करत आहेत. सलग दुसरी मराठी व्यक्ती या पदावर गेली आहे.

| Sakal

धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड हे १६ वे सरन्यायाधीश होते. 

| Sakal

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड ११ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्म झाला आहे. चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले. यानंतर त्यांनी प्रतिष्ठित इनलॅक्स स्कॉलरशिपच्या मदतीने हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. 

| Sakal

हार्वर्डमध्ये, त्यांनी लॉ इन मास्टर्स आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांनी ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी, हार्वर्ड लॉ स्कूल, येल लॉ स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ द विटवॉटरसँड, दक्षिण आफ्रिकेत लेक्‍चर्स दिले आहेत. 

| Sakal

डीवाय चंद्रचूड हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होण्यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि गुजरात, कलकत्ता, अलाहाबाद, मध्य प्रदेश आणि दिल्ली उच्च न्यायालयांमध्ये वकील म्हणून प्रॅक्टिस केली. १९९८ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नामांकन दिले होते

| Sakal

ठाकरे आणि शिंदे गटाच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीमुळे चंद्रचूड चांगलेच चर्चेत आले आहेत.

| Sakal

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना मासिक पगार किती आहे, आणि त्यांना काय सुविधा असता हे आपण जाणून घेऊया. यामध्ये सध्या बदल देखील झालेला असू शकतो.

| Sakal

सरन्यायाधीशांचे वेतन हे पंतप्रधानांपेक्षा जास्त असते

| Sakal

न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते - भारतीय राज्यघटनेच्या कलम १२५ मध्ये असे म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते संसदेने (भारताचा एकत्रित निधी) दिला पाहिजे.

| Sakal

न्यायाधीशांसाठी वेतन भत्ते कायद्यानुसार १ जानेवारी २००९, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना २,८०,००० मासिक उत्पन्न आणि न्यायाधीशांना २,५०,००० मासिक उत्पन्न मिळते.

| Sakal

यासोबत मोफत निवास, कर्मचारी, कार आणि वाहतूक भत्ता उपलब्ध आहे. त्यांचे वेतन संसदेद्वारे निश्चित केले जाते जे एकत्रित निधीतून मंजूर केले जाते. 

| Sakal

कार्यकाळात पगारात कोणतीही कपात नाही. न्यायाधीशाचा कार्यकाळ - वय ६५ वर्षे असतो सध्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड आहेत.

| Sakal