योनिबाबतच्या काही मिथकांबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.
गरोदरपणात सेक्स केल्याने लवकर कळा सुरू होऊन लवकर बाळ बाहेर येईल असे लोकांना वाटते जे खरे नाही.
योनिच्या स्वच्छतेसाठी अनेक उत्पादने बाजारात मिळतात. मात्र त्यांची गरज नसते. योनी नैसर्गिकरित्या स्वच्छ होत असल्याने इतर उत्पादने वापरू नयेत.
नॅचरल टॅम्पॉन्स आणि पॅड्स योनिसाठी चांगले असतात असे मानले जाते. मात्र कृत्रिम टॅम्पॉन्स आणि पॅड्समध्ये योनिसाठी हानिकारक असे काहीही नसते.
योनी खूप लवचिक असते. त्यामुळे ती पसरवली की मोठीच राहाते हे खरे नाही. ती पूर्ववत होते.
योनिच्या संसर्गासाठी प्रोबायोटिक्स उपयुक्त समजले जातात मात्र तसे नसते.
योनी सेल्फ क्लिनींग असली तरी रोज स्वच्छता करणे आवश्यक आहे.
प्रत्येक महिलेला आपल्या योनिबद्दल एवढी माहिती तर असायलाच हवी.