Kolhapur Rain Update : पाहा दिवसभर काय घडलं कोल्हापुरात?

सकाळ डिजिटल टीम

आज सकाळी साडेपाच वाजता स्वयंचलित दरवाजा नंबर 6 उघडला आणि यातून एकूण 3028 क्सूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला.

पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून सकाळपासून पावसाचा जोर कमी आहे. मात्र काही ठिकाणी वाहतूक बंद आहे.

आज दुपारी 2.30 वाजता राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा नंबर 3 उघडला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

बालिंगा दोनवडे रिव्हज पुलाच्या मच्छिंद्रिला पुराच्या पाण्याने गाठले आहे. पुराचे पाणी रस्त्याच्या खाली सुमारे ६ फूटावर आहे.

पुराचे पाणी वाढण्याची शक्यता असल्याने काल रात्री उशिरा शहरातील सुतार वाडा येथील 22 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.

या लोकांना योग्य ठिकाणी सुखरुप ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते.

सकाळी कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली येथे रस्त्यावर पाणी आल्याने कोकणात होणारी वाहतूक बंद करण्यात आली.

दुपारी साडेतीनच्या सुमारास राधानगरी धरणाचे स्वयंचलित गेट नंबर चार उघडले आहे. एकूण 4 दरवाजे (3, 4, 5, 6 ) उघडले असून यातून एकूण 7312 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पावसाचा जोर कमी झाला असल्याने गगनबावडा रोडवरील किरवे येथील पाणी कमी झाल्याने रोड वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने या मार्गाची वाहतूक कोतोली-फाटा-जोतिबा वाघबीळकडे वळवण्यात आली आहे. पोलिसांचा बंदोबस्त हजर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.