आपण आपल्या वडिलधाऱ्या व्यक्तींकडून अनेकदा ऐकतो कमी बोलावं. जास्त ऐकावं. पण का?
कमी बोलण्याचे आणि जास्त ऐकण्याचे काय फायदे आहेत, त्याने काय होईल ते जाणून घ्या.
जर तुम्ही इतरांना जास्त ऐकलत तर तुम्हाला त्यांच्या भावना, नवे पैलू समजतील. त्यांना समजून घेऊ शकाल.
जर तुम्ही इतरांना, नवीन गोष्टी ऐकल्या तर बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतील. ते जास्त मनोरंजक ठरतील.
बऱ्याचदा लोक बोलण्याच्या नादात असं बरच काही बोलून जातात की, नंतर त्यांना त्याचा पश्चाताप होतो. हे कमी बोलून टाळता येतं.
जेव्हा तुम्ही इतरांचं बोलणं, मत, भावना नीट समजून घेतात तेव्हा समोरच्याशी तुमचं नातं दृढ होत जातं.
हे लोक कमी शब्दात आपलं म्हणणं मांडतात ही कमी बोलणाऱ्यांची खासियत असते. हे लोक अधिक विचारपूर्वक आणि नेमकं, महत्वाचं ते बोलतात.
हे लोक मुद्द्याचं बोलत असल्याने त्यांना प्रकरणाचं गांभीर्य माहिती असतं. त्याविषयी ठोस माहिती असल्याशिवाय ते बोलत नाही. त्यामुळे लोकही त्यांच नीट ऐकतात.
कमी बोलणारे लोक पाल्हाळ लावत नाहीत त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा इतरांना कंटाळा येत नाही.