'आई कुठे काय करते'ही मालिका सध्या बरीच चर्चेत आहे.
कारण या मालिकेत अरुंधतीचे दुसरे लग्न अगदी थाटामाटात पार पडले आहे.
नवऱ्याने केलेली फसवणूक, पदरात तीन लग्नाला आलेली मुलं आणि पंचवीस वर्षांचा संसार यामुळे अरुंधती पुढे मोठा पेच होता
अरुंधतीने लग्नासाठी तिच्या जवळच्या मित्राची म्हणजे आशुतोषची निवड केली.
हे लग्न होणार की नाही याबाबत बऱ्याच चर्चा झाल्या पण अरुंधतीने सगळ्या विरोधाला तोंड देत हे लग्नं केले.
हे लग्न तिने करावं की करू नये याविषयीही प्रेक्षकांमध्ये बरीच मतमतांतरे होती, अनेकांनी याला विरोधही केला.
पण हे कोणत्याही वयात लग्न करण्याचा कोणत्याही स्त्रीला अधिकार आहे असे ठाम मत आज अरुंधती साकारणाऱ्या मधुराणी प्रभूलकरने मांडले आहे.