Mango Shrikhand : शेफ कुणाल स्टाइल मँगो श्रीखंड घरी कसं बनवाल? वाचा

सकाळ डिजिटल टीम

चवीला टेस्टी अशी डिश

उन्हाळ्यात तुम्हाल चटपटीत टेस्टी अशी डिश खायची असेल तर शेफ कुणालची ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता.

Mango Shrikhand

मँगा श्रीखंड

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या काही भागांत मँगो श्रीखंड फारच प्रसिद्ध आहे. चवीलाही ही डिश फारच छान वाटते. ही डिश बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही.

Mango Shrikhand

साहित्य

१ किलो दही, वेलदोडे पावडर १ छोटा चमचा, जायफळ पावडर १/४ टीस्पून, एक चीमूट केशर, बारीक साखरेचं पावडर १ पाव किलो, आंब्याचं बारीक मिश्रण १ कप, मुठभर कापलेली बदाम पिस्ता

Mango Shrikhand

पुरीसाठी साहित्य

कणीक २०० ग्राम, वेलदोडे पावडर अर्धा चमचा, बडीशेप पावडर १ चमचा, एक चिमुट भिजवलेलं केशर, सोजी २ मोठे चमचे एक मोठा चमचा मीठ, तळण्यासाठी तेल

Mango Shrikhand

श्रीखंड बनवण्याची पद्धत

श्रीखंड बनवण्यासाठी एका कापडात दही घालून त्याला रात्रभर बांधून कुठेतरी लटकवून ठेवा. जेणेकरून त्याचे पूर्ण पाणी निघून जाईल. यासाठी तुम्ही सूती कापडाचाही वापर करू शकता.

Mango Shrikhand

स्टेप २

हे दही जेव्हा फ्रिजमध्ये घट्ट येईल तेव्हा त्याला चाळणीने गाळून घ्या. आता दह्यात वेलदोडे पावडर, भिजवलेले केशर टाका.

Mango Shrikhand

स्टेप ३

दह्यामध्ये चीनी पावडर टाका आणि त्यात आंब्याची प्यूरी पूर्णपणे टाकून द्या. आता यात कापलेले पिस्ता आणि बदाम टाकून मिक्स करून घ्या.

Mango Shrikhand

स्टेप ४

आता श्रीखंडासह पूरी बनवण्यासाठी एका वाट्यात कणीक, वेलदोडे पावडर, बडीशेप पावडर आणि मीठ, तेल व पाणी टाकून हे मिश्रण मळून घ्या. दहा मिनीटं मळलेलं पीठ ठेवून त्याच्या पुऱ्या बनवून घ्या.

Mango Shrikhand

स्टेप ५

आता गरम गरम पुऱ्या आणि मँगो श्रीखंडाचा आनंद घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango Shrikhand