जग्गू आणि ज्युलियट सिनेमाची शूटिंग देवभूमी उत्तराखंडमध्ये झालं. तेथील आठवणी वैदेहीने आज महाशिवरात्रीनिमित्त सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत
वैदेही म्हणते,आपल्या आयुष्यातला प्रत्येक प्रवास आपल्याला खूप काही देऊन जातो. तसंच “जग्गु आणि Juliet” या सिनेमाचा प्रवास देखील मला खूप मोलाचा अनुभव देऊन गेला.
कधीच न पाहिलेलं, अनुभवलेलं उत्तराखंड डोळे भरून पाहता, आणि मन भरून अनुभवता आलं.कळत नकळत अनेक माणसं जोडली गेली.काही जवळची माणसं अधिक घट्ट झाली.
ती पुढे म्हणते, प्रत्येक दिवस एक नवीन शिकवण, एक नवा अनुभव देऊन गेला.सतत शिकत राहण्याची, उत्तमोत्तम काम करत राहण्याची प्रेरणा देऊन गेला.
आपल्या आयुष्यातील सहप्रवासींच्या जीवनात आनंद आणि सकारात्मकता आणत राहण्याची इच्छा निर्माण करून गेला.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना काही कारणास्तव घडते. आपल्याला ती कारणे कधी कळतात, कधी कळत नाहीत. पण एक मात्र नक्की, जे काही घडतं ते आपल्या भल्या साठीच!
अशी पोस्ट आज अभिनेत्री वैदेहीने सोशल मीडियावर शेअर केली आहे
महाशिवरात्रीनिमित्त तिने देवभूमी उत्तराखंड येथील आठवणी जाग्या केल्या.