गौतम अदानींची मुलं काय करतात? एकाचा नुकताच झाला साखरपुडा

| Sakal

गौतम अदानी यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचे नाव करण अदानी आणि धाकट्याचे नाव जीत अदानी आहे. जीतचा नुकताच दिवा शाह सोबत साखरपुडा झाला आहे.

| Sakal

धाकटा मुलगा जीत अदानी याचा जन्म 7 नोव्हेंबर 1997 रोजी झाला. जीत अदानी यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.

| Sakal

2019 मध्ये जीत भारतात परतला. जीत अदानी आणि त्याचा मोठा भाऊ करण या दोघांनीही परदेशातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

| Sakal

जीतनेही वडील आणि भावाप्रमाणे व्यवसाय हाताळण्यास सुरुवात केली आहे.

| Sakal

जीत अदानी हे 2019 पासून अदानी समूहाशी संबंधित आहेत आणि त्यांचा व्यवसाय त्यांच्या वडिलांसोबत शेअर करत आहेत.

| Sakal

जीत अदानी यांची 2022 मध्ये अदानी समूहामध्ये उपाध्यक्ष (वित्त) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

| Sakal

अदानी समूहाचा देशात आणि जगात मोठा व्यवसाय आहे. या समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी आहेत.

| Sakal

अदानी समूह मुख्यत्वे बंदरे, तेल आणि वायू उत्खनन, वीज निर्मिती, कोळसा व्यापार, गॅस वितरण आणि कोळसा खाण या व्यवसायात गुंतलेला आहे.

| Sakal