Udayanraje Bhosale : उदयनराजेंनी शालीच्या सहाय्याने 'या' बड्या नेत्याचा गळा का आवळला?

| Sakal

उदयनराजेंची घेतली भेट

सातारा : नाशिक पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतीच खासदार उदयनराजे भोसले यांची शासकीय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली.

| Sakal

शालीनं आवळला गळा

या वेळी उदयनराजेंनी आमदार तांबे यांच्या गळ्यात शाल घालताना शालीचा एक कोपरा तांबे यांच्या गळ्याभोवती आवळत मिस्कीलपणे म्हणाले, ‘‘पदवीधरच्या निवडणुकीत असाच सगळ्यांनी त्रास दिला ना.’’ यावर एकच हश्या पिकला.

| Sakal

तांबे कोल्हापूर दौऱ्यावर

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते.

| Sakal

सदिच्छा भेट

कोल्हापूरला जाताना तांबे यांनी विलासपूर येथील उद्योजक व खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक संग्राम बर्गे यांची सदिच्छा भेट घेतली.

| Sakal

शासकीय विश्रामगृहावर दिलखुलास चर्चा

त्यानंतर सत्यजित तांबे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.

| Sakal

शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार

नवनिर्वाचित आमदार तांबे यांचा उदयनराजे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

| Sakal

निवडणुकीत असाच सगळ्यांना त्रास दिला ना?

मात्र, शाल घालताना उदयनराजे यांनी शालीचा एक कोपरा तांबे यांच्या गळ्याभोवती आवळत मिस्कीलपणे पदवीधरच्या निवडणुकीत असाच सगळ्यांना त्रास दिला ना, अशी टिप्पणी केली. (फोटो : प्रमोद इंगळे)

| Sakal