देशातला सर्वात श्रीमंत माणूस आहे शुद्धशाकाहारी अन् नॉन ड्रिंकर

धनश्री भावसार-बगाडे

जन्म

मुकेश अंबानी यांचा जन्म १९ एप्रिल १९५७ ला ब्रिटीश कॉलनी एडन इथे झाला. पुढच्या वर्षीच अंबानी परिवार भारतात परतले. त्यांच्याविषयीच्या काही गोष्टी ज्या फार कमी लोकांना माहित आहेत.

Mukesh Ambani | esakal

पब्लिक ट्रांस्पोर्ट

त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावरही ते पब्लिक ट्रांस्पोर्टने प्रवास करायचे. त्यांना कधी अलाउंसही मिळाला नाही.

Mukesh Ambani | esakal

शिक्षण

त्यांनी सुरुवातीचं शिक्षण मुंबईत केलं. त्यांनी केमिकल इंजिनीअरिंग केलं आहे. नंतर स्टँडफर्ड युनिव्हर्सीटीतून एमबीए केलं.

Mukesh Ambani | esakal

धीरुभाई अंबानी

त्याचकाळात वडिल धीरुभाई अंबानी रिलायंस उभारण्यात लागलेले होते. त्यांनी १९८१मध्ये मुकेश यांना एमबीए सोडून परत यायला सांगितलं.

Mukesh Ambani | esakal

कौशल्याचा वापर

मुकेश अंबानी यांनी आपल्या कौशल्य आणि हुशारीच्या आधारवर हळू हळू रिलायंस कंपनीला वर आणत नवीन शतकाच्या सुरुवातीपर्यंत देशातली सर्वात मोठी कंपनी बनवली.

Mukesh Ambani | esakal

कौटुंबिक वाद

वडिलांच्या मृत्यूनंतर मुकेश आणि लहान भाऊ अनिल यांच्यात वाद झाल्याने मालमत्तेची वाटणी झाली

Mukesh Ambani | esakal

कुटुंब

मुकेश अंबानी यांनी नीता अंबानींशी लग्न केलं. त्यांना आकाश, अनंत आणि ईशा असे तीन मुलं आहेत.

Mukesh Ambani | esakal

घर

त्यांच्या २५ मजली घराचे नाव एंटिलिया असं आहे. सध्याचे सगळ्यात आधुनिक आणि महागडे असे त्यांचे घर आहे.

Mukesh Ambani | esakal

प्लेन गिफ्ट

मुकेश अंबानी यांनी पत्नीला ४४ व्या वाढदिवशी ६० मिलीयन डॉलर्सचे प्लेन गिफ्ट केले होते.

Mukesh Ambani | esakal

शुद्ध शाकाहारी

मुकेश अंबानी शुद्ध शाकाहारी आहेत. ते दारुला स्पर्शही करत नाहीत. अत्यंत साध्या पद्धतीने जगण्यावर विश्वास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mukesh Ambani | esakal