शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यामुळे नाशिक-मुंबई-पुणे हा विकासाचा सुवर्ण त्रिकोण उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील १० जिल्ह्यांशी थेट व १४ जिल्ह्यांशी अप्रत्यक्ष जोडला
जाईल.
शिर्डीच्या विकासाचे नवे दालन खुले होईल, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी दिली.
समृद्धी महामार्गावरील सर्वांत मोठ्या सिन्नर इंटरचेंजमुळे शिर्डी, अहमदनगर, नाशिक व पर्यायाने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण होणार आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा यावेळी उपस्थित असणार आहेत.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील हेही यावेळी उपस्थित असणार आहेत.