महाराष्ट्राची ओळख असलेल्या नऊवारी साडीचा इतिहास खूप जुना आणि रोमांचक आहे.
इतिहासातील पराक्रमी विरांगणांनी याच नऊवारीवर अनेक इतिहास रचले.
नऊवारी साडी नेसून अनेक पराक्रमी विरांगणांनी युद्ध लढले. त्यामुळे नऊवारी हे स्त्रीशक्ती, साहसाचे प्रतीक मानले जाते.
नऊवारीचे तसे अनेक नावे आहेत. काष्टी, सकाच्चा, पातळ आणि लुगडी या नावानेही ही साडी ओळखली जाते.
कालांतराने नऊवारीमध्ये अनेक प्रकार आले आणि बदलही झाले पण नऊवारी नेसण्याची संस्कृती मात्र वृद्धिंगत होत गेली.
आधी नऊवारी ही धोती प्रमाणे नेसली जायची. असं म्हणतात की धोतीवरुन प्रेरणा घेत नऊवारी साडी नेसण्याची सुरुवात झाली.
पूर्वी महिला नऊवारीवर अस्र-शस्रचा वापर करायचा, हा नऊवारीचा प्लस पॉईंट होता.
पूर्वी नऊवारी साडी ही प्रामुख्याने कॉटनची बनवली जायची पण काळानुसार ही अनेक कापड्यांच्या प्रकारांमध्ये दिसून येते.
हल्ली सणावारांना, कार्यक्रम किंवा सोहळ्यात नऊवारी प्रामुख्याने नेसली जाते.
नऊवारी ही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत नऊवारीला मानाचे स्थान आहे.
महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही एका पेक्षा एक भारी नऊवारी साड्या मिळतील.