Navratri 2022: उपवासाचे बटाटा पॅटीस कसे बनवायचे घ्या जाणून

सकाळ डिजिटल टीम

नवरात्रीचे उपवास सुरु आहे. रोज शाबु, वरी आणि शाबुवडे खाऊन कंटाळा येतो.

तर आज जाणून घ्या उपवासाचे चविष्ट बटाटा पॅटीस

उकडलेले बटाटे

खोवलेला नारळ

शेंगदाण्याचे कूट

कोथिंबीर

लिंबाचा रस

तेल

अरारुटच पीठ

'उपवासाचे बटाटा पॅटीस' बनवण्याआधी सारण बनवणं गरजेचं आहे. एका भांड्यात खोवलेला नारळ, शेंगदाण्याचं कूट, मसाल्याचं वाटण, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि मीठ घालून ते मिसळून घ्या.

एका भांड्यात उकडलेल्या बटाट्याच्या बारिक बारिक फोडी करुन घ्या. अरारुटच्या पीठात मीठ घालून ते मिसळून घ्या.

आता आपल्या हातावर बटाट्याचे मिश्रण घ्या आणि त्याला हातानेच पुरीचा आकार द्या. पुरीच्या आकारात नारळाचे सारण भरा आणि गोलाकार करा.

सर्व गोळे तयार करून त्या बॉलच्या आकाराचे गोळे अरारुटचच्या पिठामध्ये रोळून घ्या. कढईत तेल टाकून त्यात बटाट्याचे गोळे हळुवार सोडा.

चविष्ट गरम उपवासाचे बटाटा पॅटीस हिरवी चटणी आणि दहीसोबत चविष्ट लागतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.