नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळीच कुस्तीपटूंची उचला - उचली

| Sakal

नवे संसद भवन उद्घाटन

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले.

| Sakal

महिला कुस्तीपटूंचे आंदोलन

या इमारतीसमोरच भारतीय महिला कुस्तीपटू आंदोलन करणार होत्या. त्यांनी नव्या संसद भवनाच्या समोर महिलांची महापंचायत भरवण्याचा निर्णय घेतला होता.

| Sakal

दिल्ली पोलिसांची कारवाई

मात्र त्यापूर्वीच कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.

| Sakal

साक्षी मलिक म्हणाली...

याबद्दल साक्षी म्हणाली, आमचे पंतप्रधान नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत आहेत. मात्र दुसरीकडे आमच्या समर्थकांना अटक केली जात आहे. लोकांना अटक करून आपण कसं काय म्हणू शकतो की ही लोकशाहीची जननी आहे. भारताच्या कन्या वेदनेत आहेत.'

| Sakal

विनेशची प्रतिक्रिया

'जंतर मंतरवर लोकशाहीची दिवसा ढवळ्या हत्या झाली आहे. एका बाजूला पंतप्रधान नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत आहेत. दुसरीकडे लोकांना अटक केली जात आहे.'

| Sakal

बृजभूषण सिंह

महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

| Sakal