Online dating करताना हे नियम पाळा

नमिता धुरी

तुम्ही कोणाला ऑनलाइन डेट करत असाल तर त्या व्यक्तीशी खोटे बोलू नका.

काही लोक प्रोफाईलला असे काही फोटोज लावतात की त्यामुळे समोरची व्यक्ती भाळते. पण प्रत्यक्षात तुम्ही तसे दिसत नसाल तर ती व्यक्ती दुखावली जाऊ शकते.

नव्या नात्याची सुरुवात करताना भूतकाळातील कटू आठवणी विसरा.

तुमच्या आधीच्या जोडीदाराला तुम्ही विसरू शकत नसाल तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही नवीन नात्यासाठी तयार नाही आहात.

ऑनलाइन डेटींगमध्ये तुम्ही एकमेकांसमोर नसता. त्यामुळे शब्द जपून वापरा.

बोलण्यावरून तुमचे व्यक्तिमत्त्व दिसून येईल. त्यामुळे बोलताना काळजी घ्या.

कोणालाही ऑनलाइन डेट करण्याआधी त्या व्यक्तीचे सोशल मीडिया अकाऊंट तपासा.

खासगी आयुष्य, खासगी छायाचित्रे आणि कामाबाबत जास्त माहिती शेअर करू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.