राजधानी साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानाजवळील इमारतीवर खासदार उदयनराजेंचं पेटिंग 100 फूट उंच क्रेन लावून रेखाटण्यास सुरुवात झाली आहे.
इमारती ठिकाणी असलेला पोलिसांचा बंदोबस्त देखील हटवण्यात आल्यानं तणाव निवळला आहे.
गेल्या 3 दिवसांपासून या पेटिंगवरून साताऱ्यात वातावरण गरम झालं होतं.
पेटिंग काढण्यास कोणाचीच हरकत नसल्यानं उदयनराजे समर्थकांमधून जल्लोष केला जात आहे.
तर, सोशल मीडियावर मंत्री देसाई खासदार उदयनराजेंना मुजरा करत असल्याचा व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे.
'किंग ऑफ हिंदुस्थान' अशी टॅगलाइन टाकून शंभूराज देसाई यांना राजे समर्थकांकडून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. (फोटो : प्रमोद इंगळे)