Vastu Tips : पारिजातकाच्या फुलांचे हे उपाय कराच, नशीब 100% बदलेल

सकाळ डिजिटल टीम

परिजातकाच्या झाडाला लकी म्हणतात

घरामध्ये पारिजातकाचं झाड लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते असे म्हटले जाते. मात्र हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लाऊ नका. वास्तुदोष वाढतो.

Vastu Tips

घरातील वास्तुदोषांवर उपाय

या वनस्पतीचे फूल पाहून जीवनात शांती मिळते. घरातील लोकांचा मानसिक तणाव दूर होतो, सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

Vastu Tips

नोकरी अन् व्यवसायाच्या यशासाठी

नोकरी किंवा व्यवसायात बऱ्याच काळापासून यश मिळत नसेल तर २१ फुले लाल कपड्यात गुंडाळून देवघरात माता लक्षीशेजारी ठेवा. या उपायाने प्रगती होते असे म्हटले जाते.

Vastu Tips

निरोगी आरोग्य

आयुर्वेदातही हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पारिजाताच्या पानांपासून बनवलेला काढा रक्तदाब आणि मधुमेह कमी करू शकतो.

Vastu Tips

आर्थिक अडचणी

तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तर पारिजातकाची फुले फार महत्वपूर्ण मानली जातात.

Vastu Tips

पारिजाताच्या वनस्पतीच्या मुळाचा तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मीसमोर ठेवावा. यानंतर देवी लक्ष्मीची व मुळाची विधिवत पूजा करावी आणि मुळावर हळद व कुंकू वाहा. यानंतर कनकधारा स्तोत्राचे पठण करावे.

Vastu Tips

पूजा केल्यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये मूळ ठेवा. असे केल्याने तुमची कर्जातून लवकरच सुटका होईल आणि अडकलेला पैसाही मिळतो, असे मानले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips