तुमच्या आवडीचे कपडे तुमच्या विषयी बरेच काही सांगतात, असं मानसशास्त्र सांगते. प्रत्येकाला चांगले दिसायला आवडते. पण तुम्ही करत असलेली स्टाइलिंग तुमच्या व्यक्तीमत्व, स्वभावाविषयी बरच काही सांगते.
फोटोत तुम्हाला ५ प्रकारचे कपडे दिसत आहेत. त्यापैकी तुम्हाला कोणत्या प्रकारचे कपडे आवडतात ते निवडा आणि जाणून घ्या स्वभाव वैशिष्ट्य.
जर तुम्ही पहिला प्रकार निवडला असेल तर तुम्ही आत्मविश्वासी, शांत, साहसी आहात. जीवनात एक्साइटमेंट आवडते. नव्या संधी आणि आव्हानांसाठी कायम तयार असतात.
जर तुम्हाला शॉर्ट्स आवडत असतील तर याचा अर्थ तुम्ही सामाजिक आहात. लवकर मैत्री करतात, कनेक्शन बनवतात. स्माईल क्युट आहे. आपले दुःख सगळ्यांपासून लपवून ठेवतात.
जर तुम्हाला फ्रॉक घायला आवडतो तर याचा अर्थ तुम्ही लाजाळू आणि रिझर्व टाइपचे आहात. ओपन अप व्हायला वेळ लागतो. विनम्र आणि दयाळू आहात. भांडणांपासून लांब राहतात.
जर तुम्हाला वन पीस ड्रेस आवडत असतील तर याचा अर्थ तुम्ही लॉजिकल व्यक्ती आहात. भावनेपेक्षा लॉजिक्सला महत्व देतात. तुम्ही विनोदी आणि सभ्य आहात. कोणी तुम्हाला सहज वेडं बनवू शकत नाही. तुमचे स्वप्न मोठे असतात. ते मिळवण्यासाठी तुम्ही फार कष्ट करतात.
जर तुम्हाला हा आउट फीट आवडत असेल तर याचा अर्थ तुम्ही स्वतंत्र आणि उग्र व्यक्ती आहात. तुम्ही फार क्रिएटिव्ह आहात. इतरांकडून मदत घ्यायला संकोच वाटतो. पटकन कोणात मिसळत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.