यंदाचा पितृपक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे हा 25 सप्टेंबरपर्यंत हा पितृपक्ष चालणार आहे. या दरम्यान लोक आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध विधी करतात.
पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे आत्मा हे पृथ्वीवर येतात असा समज आहे. या पितृपक्षात होणाऱ्या घडामोडीचा परिणाम हा व्यक्तीच्या जीवनावर होऊ शकतो. हा परिणाम टाळण्यासाठी विधी करतात.
आपल्या हिंदु संस्कृतीत पितृ पक्षात संदर्भात काही नियम आहेत. त्या नियमांचे चुकूनही उल्लंघन करू नये.
पितृ पक्षामध्ये तांदूळ, मांस, लसूण, कांदा आणि बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे. तसेच या काळात वांग्याची भाजीही खाऊ नये.
याशिवाय मसूर, काळी उडीद, हरभरा, काळे जिरे, काळे मीठ, काळी मोहरी आणि कोणतेही अशुद्ध किंवा शिळे अन्न श्राद्धात वापरू नये. ज्या व्यक्तीला पितृ पक्षात श्राद्ध करावे लागते. त्याने आपले केस, दाढी आणि नखे देखील कापू नयेत.
तसेच दैनंदिन काम करताना चामड्याचे काहीही घालू नये. अगदी चामड्याची पर्स किंवा पाकीटही जवळ ठेवू नये
श्राद्ध करताना मंत्रांचा जप करताना कोणत्याही व्यत्ययावर थांबू नका.