Pooja Hegde : सलमानचा जीव जडला म्हटल्यावर...

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पुजा हेगडेच्या नावाभोवती वेगळं वलय तयार होताना दिसते आहे.

काही दिवसांपासून पुजा आणि बॉलीवूडचा भाईजान सलमान खान यांच्या अफेयरची चर्चा आहे.

पुजा ही सलमान सोबत किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र येत आहे.

सोशल मीडियावर सलमानसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा रंगताना दिसते आहे.

सलमानची नवी गर्लफ्रेंड कोण यावरुन वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. त्यात एका अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमानसोबत पुजाचे नाव आल्यानं चाहत्यांमध्ये वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

सलमानच्या नव्या चित्रपटाचा टीझर आणि दोन गाणी आतापर्यत प्रदर्शित झाली असून त्यातील पुजाच्या लूकवर चाहते फिदा आहेत.

किसी का भाई किसी की जान हा चित्रपट एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Hegde Bollywood actress