प्रियंका आणि नीक यांच्या दहा वर्षांचा एज गॅप आहे. तरी त्यांचं नातं मात्र घट्ट आहे.
प्रियंका तिच्या पर्सनल लाइफ कायम ओपनली बोलत असते. एका मुलाखतीत तिने निकच्या काही सवयींबाबत सांगितले.
प्रियंकाने बेडरूम सीक्रेट्सबाबत सांगितले की, बेडरूमच्या त्याच्या काही सवयींमुळे ती फार वैतागली आहे.
निकला सकाळी उठताच प्रियंकाचा चेहरा बघणं फार आवडतं. तो कितीतरी वेळ तिला एकटक बघत असतो.
प्रियंकाने इंटरव्ह्यूमध्ये म्हटले की तिने बरेचदा निकला याबाबत समजावले की आधी तिला तयार होऊ दे. पण नीक काही तिचं ऐकेना. नीक तिला सरळ म्हणतो, प्रियंका मला तुला बघायचं आहे.
प्रियंकाने म्हणाली की, प्रत्येक मुलीला तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करावं असं वाटतं. मात्र कधीकधी तिला निकवर फार प्रेम येतं तर कधी तिचा फार रागही येतो.
पुढे प्रियंका म्हणजे की ती निकपासून एक आठवड्यापेक्षा जास्त काळ दूर राहू शकत नाही. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो ते एकमेकांना भेटतात.
या जोडप्याने २०१८ मध्ये लग्न केले होते. पहिल्यांदा त्यांना मेट गाला इव्हेंटमध्ये सोबत बघितल्या गेलं होतं.