कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला
भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला
भाजपच्या हेमंत रासने यांचा त्यांनी पराभव केला आहे.
रवींद्र धंगेकर यांना शिवसेना, मनसे, काँग्रेसमधील मित्र परिवाराचा मोठा फायदा झाल्याची चर्चा आहे
धंगेकर हे काँग्रेसमध्ये येण्याआधी शिवसेनेत आणि मनसेत होते. कसब्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.
रवींद्र धंगेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात
मनसेत त्यांचे मोठे वजन होते, चारवेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते
धंगेकरांनी २००९ मध्ये मनसेकडून विधानसभा निवडणूक लढली होती. गिरीश बापट यांना मोठं आव्हान दिलं होतं.
बापट यांनी नवख्या धंगेकरांवर केवळ ७ हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर बापट यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख झाली.
पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबात भाजपने उमेदवारी न दिल्याने धंगेकरांनी मोठा फायदा घेतला.
धंगेकर यांनी शिनसेना, मनसे आणि काँग्रेसमध्ये मोठी फिल्डींग लावली
तसेच कसब्यातील नाराज भाजप समर्थकांचा त्यांना फायदा झाला.
धगेकरांनी ११ हजार मतांच्या फरकाने निवडून आले