Ranbir Kapoor: बॉलीवूडचा चॉकलेट बॉय झाला ४० वर्षाचा

| Sakal

रणबीरचा जन्म 28 सप्टेंबर 1982 ला मुंबईमध्ये झाला. नीतू कपूर आणि ऋषी कपूर हे त्याचे आई बाबा आहेत.

| Sakal

रणबीरची बॉम्बे स्कॉटिश स्कूल, माहीम ही शाळा होती. रणबीरला शाळेत अभ्यासात इतका रस नव्हता पण तो खेळात चांगला होता. तो फुटबॉल चांगला खेळायचा.

| Sakal

कॉलेजच शिक्षण पूर्ण झाल्यावर रणबीर फिल्म मेकिंग शिकण्यासाठी न्यूयॉर्कला गेला.

| Sakal

रणबीरने एक शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली तर दोन शॉर्ट फिल्ममध्ये त्यानं काम केलं.

| Sakal

भारतात परत आल्यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक या सिनेमासाठी त्याला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

| Sakal

2009 मध्ये रणबीरने 3 मोठ्या सिनेमात काम केलं आणि हे तीनही सिनेमे बॉक्सऑफिसवर चांगलेच गाजले. 

| Sakal

अजब प्रेम की गजब कहानी या सिनेमातल्या रणबीरच्या अभिनयाची फारच चर्चा झाली होती. 2009 च्या सर्वोत्तम कमाई करणार्‍या सिनेमांपैकी हा सिनेमा चौथ्या क्रमांकावर होता.

| Sakal

रणबीरने बर्फी, यह जवानी है दिवानी, बेशरम, रॉय, बॉम्बे वेलवेट, तमाशा, ए दिल है मुश्किल, जग्गा जासूस, संजू  या सिनेमात काम केलं.

| Sakal