गोल्डर्न गर्ल बनलेल्या रश्मिकानं दिल्या किलर पोझ..

प्रणाली मोरे

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर नेहमीच तिचे सुंदर-सुंदर फोटो शेअर करत असते.

Esakal

रश्मिका लवकरच आता 'गूडबाय' सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. सध्या ती प्रमोशन निमित्तानं अनेक ठिकाणी कार्यक्रमातून हजेरी लावताना दिसत आहे.

Esakal

रश्मिकानं तिचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे, तिनं गोल्डन रंगाचा शिमरी लेहेंगा घातला आहे. ज्यात डीप नेक कट स्लीवलेस ब्लाऊजमध्ये तिनं एथनिक लूकलाही बोल्डनेसचा तडका दिला आहे.

Esakal

तिनं या फोटोत दिलेल्या किलर पोझ लोकांचे हार्टबीट्स वाढवत आहेत एवढं मात्र नक्की.

Esakal

रश्मिकानं हे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांनाच आपल्या लूकविषयी प्रश्न विचारला आहे.

Esakal

तिनं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे-''मी आज गोल्डर्न गर्ल आहे...किती कूल रंग आहे ना हा. कसा वाटला माझा हा लूक?''

Esakal

लोकांनी रश्मिकानं लूक विषयी विचारलेल्या प्रश्नावर तिच्या सौंदर्यांची प्रशंसा करत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'ती ३६५ दिवस गोल्डर्न गर्लच दिसते', असं एका चाहत्यानं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal