Realme 11 Pro सीरीज लाँच! 200MP कॅमेऱ्यासह भन्नाट फीचर्स, पाहा किंमत

| Sakal

Realme

रिअलमी कंपनीने भारतात आपली 11 Pro सीरीज लाँच केली आहे. यामध्ये Realme 11 Pro आणि Realme Pro+ 5G या मॉडेल्सचा समावेश आहे.

| Sakal

Realme 11 Pro

या फोनचं बेस मॉडेल 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतं. याची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 24,999 रुपये आहे.

| Sakal

टॉप व्हेरियंट

Realme 11 Pro च्या टॉप व्हेरियंटमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आलंय. याची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

| Sakal

Realme 11 Pro+

या फोनच्या बेस मॉडेलची किंमत 27,999 रुपये असणार आहे. यामध्ये 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आलं आहे. तर याच्या टॉप मॉडेलमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आलंय. याची किंमत 29,999 रुपये आहे.

| Sakal

200 MP कॅमेरा

Realme 11 Pro+ या स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर, 11 Pro या मॉडेलमध्ये 100 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

| Sakal

फ्रंट कॅमेरा

Realme 11 Pro फोनमध्ये 16 MP क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर, 11 Pro+ फोनमध्ये 32 MP क्षमतेचा कॅमेरा दिला आहे.

| Sakal

बॅटरी आणि चार्जिंग

या दोन्ही फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 11 Pro हा 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, तर 11 Pro+ हा 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

| Sakal

सॉफ्टवेअर

या दोन्ही फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 SoC प्रोसेसर देण्यात आलाय. तसंच, दोन्ही फोन अँड्रॉईड 13 या OS वर चालतील.

| Sakal

डिस्प्ले

या दोन्ही फोनमध्ये 6.7 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. तसंच, दोन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असणार आहे.

| Sakal