उन्हाळ्यात हार्ट अटॅक का येतो?
उन्हाळ्यात तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त वाढतं. ज्यामुळे डिहायड्रेशन झाल्याने रक्ताची पातळी कमी होते त्यामुळे हृदयावरचा दाब वाढतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
हार्टचं कार्य वाढतं
उन्हाळ्यात शरीराचं तापमान जास्त असल्याने ते नियंत्रित करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे हृदयावर अतिरिक्त दाब पडतो.
या खाद्यपदार्थांनी वाढतो धोका
उन्हाळ्या काही पदार्थांनी हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
चिप्स आणि प्रोसेस्ड फूड
चिप्स आणि प्रोसेस्ड फूडमुळे सोडियमची मात्रा वाढते. यामुळे ब्लड प्रेशर वाढते. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो.
रिफाइंड शुगर
उन्हाळ्यात जास्त गोड खाणे शरीरासाठी नुकसानदायी ठरू शकते. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
असा करा बचाव या फळांचं सेवन करा
हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी या उपायांचा वापर करू शकता. उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी टरबूज, काकडी, पपई, खरबूज ही फळे खा. यात भरपूर प्रमाणात पाणी असते.
भरपूर पाणी प्या
या वातावरणात सर्वाधिक पाणी प्या.
हिरव्या पालेभाज्या खा
उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर पालेभाज्या खा. आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर होतील.