गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद उफाळून आला आहे.
बोम्मई यांची बेताल वक्तव्यं सध्या चर्चेत आहेत.
कर्नाटकातली गावं देणार नाही, पण महाराष्ट्रातलीच घेणार, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.
शिवाय, महाराष्ट्रातल्या नेत्याला इथं फिरकू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.
हा वाद पेटता असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कर्नाटकात गेले आहेत.
त्यांनी बेळगावला भेट दिली आहे.
तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे.
तसंच तिथल्या मराठी बांधवांना पाठिंबा दर्शवला आहे.