शेगावचे संत गजानन महाराज हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या विचारांनी अनेकांना दिशा दाखवली, आयुष्य घडवले. असे काही विचार बघुया.
आज गजानन महाराज पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे.
कणांपासून सृष्टी बनली। त्यातील मी एक क्षुल्लक कण।। मात्र प्रत्येक कणात आहे। माझा गजानन..!!
कासावीस झालो आता विरह सहावेना । दर्शनाविना तुझ्या माऊली राहवेना..!!
अधीर झाले मन आणखी वाट पहावेना।। ।।गण गण गणात बोते..!!
देवा झाले तुझे उपकार। उघडलेसी तू द्वार।। तुझ्या दर्शनासाठी। आहोत आम्ही तय्यार..!!
माझे चित्त माझे मन।बोले जय गजानन।। जीवनातील प्रत्येक क्षण। गजाननाला अर्पण..!!
शेगाव गावी वसले गजानन l स्मरणे त्यांच्या हरतील विघ्न ll म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला l नमस्कार माझा श्री गजाननाला ll
ज्याचे नाम सदैव ओठी। त्या गजाननाला माझे वंदन कोटी कोटी।।