Sara Ali: साराचं 'शुभमन' फिल! 'डेटिंग' रंगलंय

युगंधर ताजणे

अतरंगी रे फेम सारा अली खान वेगळ्याच गुलाबी चर्चेत आली आहे. चाहत्यांनी त्या व्हायरल झालेल्या पोस्टवर दणकून कमेंट केल्या आहेत.

सारा ही सोशल मीडियावर चर्चेतील अभिनेत्री आहे. तिला फॉलो करणारा चाहतावर्गही मोठा आहे.

सारा आणि भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध फलंदाज शुभमन गिल यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.

सारा - शुभमन हे दुबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये डिनर करत असल्याचे दिसून आले आहे. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

शुभमन गिल सध्या इंग्लंडमध्ये आहे. सारासोबत तो डिनरला गेल्यानं वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.

यापूर्वी शुभमनचं नाव हे सचिन तेंडूलकरची मुलगी सारासोबत जोडलं जात होतं. मात्र आता ते सैफच्या साराशी घेतलं जातंय..

साराचं डेटिंग जोरात सुरु असून तिला नेटकऱ्यांनी तिच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

त्या पोस्टवर दोन्ही सेलिब्रेटींकडून त्याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.