सध्या सोनू सूद त्याचा आगामी अंक्शन सिनेमा 'फतेह'साठी दिवस-रात्र काम करत आहे
या सिनेमात सोनू सूद एका नवीन लूक प्रेक्षकांना दिसणार आहे. या भूमिकेसाठी तो मेहनतही तितकीच घेत आहे.
चाहते त्याचे वर्कआउट रूटीन, आहार आणि फिटनेसचे रहस्य जाणून घेण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत.
अलीकडेच सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघांनी अत्यंत थरारक असे स्टंट्स केले आहेत.
या आधी कोणत्याही चित्रपटात केले नाही असे वेगळे काही तरी सोनू सूद या चित्रपटात करण्यासाठी सज्ज आहे.
त्याच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी तंदरूस्त आणि टोन्ड शरीर मिळवण्यासाठी तो प्रशिक्षण घेत आहे.
त्याच्या प्रशिक्षणाच्या सेटवरील झलक त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सोनू सूद सध्या ॲक्शन सीक्वेन्ससाठी शूटिंग करत आहे.