स्विगीचा खाद्य पदार्थ ऑर्डरचा रिपोर्ट समोर आला आहे.
यामध्ये सर्वाधिक म्हणजे ऑर्डर्स बिर्याणीच्या आहेत. प्रतिसेकंद तीन बिर्याणीच्या ऑर्डर नोंदवल्या गेल्यात.
बिर्याणीनंतर मसाला डोसा, चिकन फ्राईड राईस, पनीर बटर मसाला, बटर नान यांचा समावेश आहे.
त्यानंतर व्हेज फ्राईड राईस, व्हेज बिर्याणी आणि तंदुरी चिकन हे पदार्थ मागवले गेले.
तसेच २७ लाख वेळा गुलाबजामची ऑर्डर स्विगीवर करण्यात आल्या आहेत.
तर १६ लाख वेळा रसमलाईची ऑर्डर केल्या गेल्या आहेत.
बंगळुरुमध्ये एका व्यक्तीनं एकाचवेळी ७५,३७८ रुपयांचं जेवण मागवलं होतं.
त्यानंतर पुण्यातील एका व्यक्तीनं एका कंपनीच्या बॉसनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ७१,२२९ रुपयांचं जेवण मागवलं आहे.