20 रुपयांपासून ४० कोटी रुपयांचं टनओव्हर कमवणारी ही चीनू काला, जाणून घेऊया प्रवास
चीनूला १०वी मधून शिक्षण सोडावं लागलं होतं.
वयाच्या १५ व्या वर्षी वडिलांशी भांडणं झाल्यावर चीनूने ३०० रुपये आणि कपड्यांची बॅग घेऊन घर सोडले.
पहिली रात्र रेल्वे स्टेशनवर घालवली. नंतर ती सेल्स गर्ल बनली आणि दिवसाला २० रुपये कमवू लागली.
एकेक पायरी चढत तिने स्वतःचा रुबन्स अॅक्सेसरी ब्रँड तयार केला. आता ती ४० कोटी टनओव्हर घेते.
चिनू काला यांनी रुबन्स अॅक्सेसरीज 3 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून 36 चौरस फूट किऑस्कमधून सुरू केली.
२०१४मध्ये हा ब्रँड एका मॉलमध्ये सुरू झाला. आणि २०१८ पर्यंत ३.३४ कोटी रुपयांच्या उलाढालीसह ५ स्टोअर्सपर्यंत वाढला.
लॉक डाऊनच्या काळात व्यवसाय ऑनलाइन सुरु झाला आणि त्याने अधिकच वेगात भरारी घेतली.