छोट्या पडद्यावरची प्रसिद्धी अभिनेत्री शहनाज कौर गिल आता लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
शहनाज गिलला आता सलमान खान याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी शहनाज गिल ही नेहमीच आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते.
नुकतेच तिने शॉटन पिंक शॉर्ट्स आणि फ्लोरल ब्रालेटमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शहनाजने ऑर्गेन्झा श्रग सोबत तिचा लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्री शहनाज गिलचे हे सुंदर फोटो प्रसिद्ध फोटोग्राफार डब्बू रत्नानी यांनी क्लिक केले आहेत. शहनाजच्या या नटखट अदांवर सगळेच फिदा झाले आहेत.
यामध्ये तिच्या सुंदर आणि बोल्ड अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शहनाज सोशल मीडियावर देखील सतत सक्रिय असते.