महेश जेठमलानी हे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे पुत्र आहेत.
ते देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक आहेत. ते सध्या शिंदे गटकडून लढतात.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईतून प्रिया दत्त यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती
मात्र त्यांचा पराभव झाला होता. सध्या ते राज्यातील सत्तसंघर्षाच्या सुनावणीत शिंदे गटाची बाजू मांडत आहेत.
भाजप नेते नितीन गडकरी यांच्याशी वाद झाल्यानंतर महेश जेठमलानी यांनी २०१२ मध्ये पक्षाचा राजीनामा दिला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश जेठमलानी एका सुनावणीसाठी लाखो रुपये घेतात.
सात वर्षापूर्वी ते साडेसात लाख रुपये फी घेत होते.