Shravan 2022: श्रावण सोमवारी पुणे जिल्ह्यातील ‘या’ मंदिरांना द्या भेट

सकाळ डिजिटल टीम

श्रावण आजपासून सुरू होतोय. श्रावणी सोमवारी मंदिरात जाणाऱ्या भक्तांसाठी पुणे शहर-जिल्ह्यातील मंदिरांविषयी जाणून घेऊया.

नऊ कळस असलेले ओंकारेश्वर मंदिर हे शनिवार पेठ येथे आहे. ऑक्टोबर १७३६मध्ये या मंदिराची पेशव्यांकडून पायाभरणी करण्यात आली होती.

खेड तालुक्यात असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांमधील सहावे ज्योतिर्लिंग आहे. येथून भीमा नदीचा उगम झाला.

पुण्यातील शिवाजीनगर येथील पाताळेश्‍वर मंदिर राष्ट्रकूट राजवटीच्या काळात इ.स. ८ व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले.

पुण्याच्या पाषाण येथे वसलेले श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर ७०० वर्षे जुने आहे. हे एक ऐतिहासिक मंदिर असून जिजाऊंच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता.

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील भुलेश्वर मंदिर प्राचीनकाळापासून प्रसिद्ध आहे. हेमाडपंती रचनेनुसार या मंदिराचा मूळ ढाचा आहे.

श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान हे डावजे डोंगरावर स्थित आहे. पुणे-मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आणि पानशेत धरणाच्या परिसरात असलेले एक सुंदर ठिकाण

बनेश्वर हे भोर येथील मंदिर असून येथे शिवलिंगाखाली पाच छोटी शिवलिंगे आहे. सतत पाणी वाहते. येथे निसर्गनिर्मित वनउद्यान व धबधबा आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.