kimaya narayan
सध्या गायक उदित नारायण त्यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. ज्यात ते एका फॅनला लीप किस करताना पाहायला मिळत आहेत. पण तुम्हाला माहितीये का ? उदित नारायण यांची संपत्ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
उदित यांचा जन्म बिहारमध्ये 1955 मध्ये झाला. त्यांचं खरं नाव झा असं आहे. 1980 मध्ये त्यांनी गायनक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.
कयामत से कयामत तक सिनेमातील पापा कहते है या गाण्यामुळे उदित यांना लोकप्रियता मिळाली. यासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळाला.
उदित यांनी आजवर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यामध्ये तामिळ, मल्याळम, नेपाळी, भोजपुरी, कन्नड, ओडिया आणि बंगाली भाषेतील गाण्यांचा समावेश आहे.
उदित यांची संपत्ती 150 करोड रुपये आहे. आजही ते अनेक कॉन्सर्टमधून पैसे कमावतात.
उदित एका महिन्यात एक करोडहुन अधिक कमाई करतात. फक्त कॉन्सर्टच नाही तर रिअलिटी शोचं परीक्षण करून त्यातूनही ते पैसे कमावतात.
मुंबईत उदित यांची अनेक घर आहेत. तर बिहारमध्येही त्यांचा आलिशान बंगला आहे. पण त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन नाहीये. पण त्यांच्याकडे मर्सिडीज बेंझ आहे.
उदित यांनी पहिलं लग्न रंजना नारायण झा यांच्याशी केलं त्यानंतर त्यांनी लगेचच दीपा नारायण झा यांच्याशी लग्नगाठ बांधली. दीपा यांनी काही काळातच त्यांचा मुलगा आदित्य नारायणला जन्म दिला.