Beauty Tips : सौंदर्य वाढवण्यासाठी गुळ आहे गुणकारी

सकाळ डिजिटल टीम

गुळ आपल्या त्वचेसाठी फार उपयुक्त आहे. यातील पोषण तत्व आणि नॅचरल क्लिंजर त्वचेला डिटॉक्स करून एक नवा तजेला देते.

गुळातले ग्लाइकोलिक ॲसिड त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते.

गुळात अँटीएजिंग गुण असतात. जर तुम्हाला चेहऱ्यावरील सुकूत्या आणि फाईनलान्सपासून सुटका मिळवायचे असेल तर गुळाचा पॅक वापरा.

पॅक बनवण्यासाठी १ चमचा गुळ, चिमूटभर हळद, १ चमचा डाळिंबाचा रस, एक चमचा ब्लॅक टी आणि गुलाबजल घालून पेस्ट बनवा. १५ मीनिटे चेहऱ्यावर लावून मग गार पाण्याने धूवा.

चेहऱ्यावरचे डाग काढण्यासाठी गुळ गुणकारी आहे. यासाठी गुळात टोमॅटो घालून लावल्यास उपयुक्त ठरते.

एक चमचा गुळात एका टोमॅटोचा रस, अर्धा लिंबू, चिमूटभर हळद मिक्स करा. १५ मीनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. मग गार पाण्याने धूवा.

ग्लोइंग स्कीनसाठी एक चमचा मध, अर्ध्या लिंबाचा रस घालून पॅक बनवा. हा पॅक १०-१५ मि. ठेवून धूवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.