Skin Care : महागडे फेसवॉशना करा बाय बाय! या एका वस्तूने चमकू लागेल तुम्हची त्वचा

| Sakal

सूर्य, धूळ, माती, घाम आणि रासायनिक उत्पादनांमुळे त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो.

| Sakal

घरगुती उपाय

अशा परिस्थितीत लोक अधिकाधिक घरगुती उपायांचा प्रयत्न करतात जेणेकरुन त्वचेला केमिकलचा धोका कमी होईल.

| Sakal

व्हिटॅमिन ए, डी आणि लॅक्टिक ॲसिड

त्वचेसाठी अशीच एक चांगली गोष्ट म्हणजे दूध. व्हिटॅमिन ए, डी आणि लॅक्टिक ॲसिडने समृद्ध असलेले दूध चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी प्रभावी ठरते.

| Sakal

दुधाने चेहरा धुण्याचे फायदे

ताजे दूध काढून तळहातात घेऊन चेहरा धुवा. चेहरा धुतल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा.

| Sakal

कापसात दूध घेऊन चोळणे

कापसात दूध घेऊन चेहऱ्याला चोळू शकता. त्यामुळे त्वचेच्या मृत पेशीही घाण स्वरूपात निघताना दिसतात.

| Sakal

वृद्धत्वावर मात करणे

चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या तर तुम्ही दुधाचा वापर सुरू करू शकता. दुधामुळे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे तर कमी होतातच शिवाय त्वचा मुलायम आणि चमकते.

| Sakal

त्वचा एक्सफोलिएट करते

त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी दूध देखील लावता येते. त्वचेवर साचलेली घाण बाहेर पडू लागते आणि चेहरा स्वच्छ आणि चमकदार दिसू लागतो.

| Sakal