महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात मृदेचे वेगवेगळे प्रकार आढळतात. तसेच या प्रकारांमुळे त्या ठिकाणी घेतली जाणारी पीके वेगवेगळी आहेत.
आज आपण महाराष्ट्रात आढळणाऱ्या मृदेचे प्रकार जाणून घ्याणार आहोत.
महाराष्ट्रातील ८०% पेक्षा जास्त भाग बेसाल्ट खडकापासून तयार झाल असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर बेसाल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते.
महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी ३/४ पेक्षा जास्त भागावर काळी मृदा आढळते.
कापसासाठी काळी मृदा खूप उपयुक्त असते. या मृदेत कापूस ज्वारी, तूर, बाजरी, गहू, ऊस इत्यादी पिके घेतली जातात.
जांभी मृदा सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अतिपर्जन्य पूर्व भागात आणि सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात ही मृदा आढळते.
जांभी मृदेत काजू व आंबा ही पिके चांगली येतात.
तांबडी मृदा राज्यात पश्चिम घाटात तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात ही मृदा आढळते.
या मृदेत मुख्यता सागाची झाडे आढळून येतात.
नद्यांच्या खोऱ्यात तसेच कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात रेतीमिश्रित गाळाची मृदा आढळते.
भात, नाचणी, पोफळी तसेच ऊस, गहू, भाजीपाला ही पिके या मातीत घेतली जातात.
चिकण मृदा ही नागपूर, गोंदिया, गडचिरोली, व चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात आढळते.
या मातीत भात गहू, ज्वारी, ऊस ही पीके घेतली जातात.