हि दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे. नुकतंच तिने आपल्या बालपणाचा फोटो शेअर केला आहे
ज्या पद्धतीने तिने लहानपाणी शाळेमध्ये नृत्य केले होते तसाच काहीसा पेहराव तिने 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाच्या निमित्ताने केला होता
या चित्रपटात तिने विविध लोकनृत्याचे प्रकार सादर केले, त्यापैकीच एक म्हणजे भांगडा
सोनालीच्या या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती
परंतु बॉक्स ऑफिसवर मात्र कमाई करण्यास तो असमर्थ ठरला