उन्हाळ्यात दूधीची भाजी खाल्ल्याने सगळे विकार दूर होतात. एवढेच नव्हे तर हाय कोलेस्टेरॉल आणि ब्लड शुगरही कंट्रोलमध्ये राहाते.
बीन्समध्ये सर्वात कमी कॅलरी असते. म्हणून वजन कमी करण्यात या फार फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यात बीन्स शरीरासाठी फार फायदेशीर ठरते.
वांगी फायबरयुक्त असतात. पोटाच्या आतड्यांसाठी वांगी फायदेशीर आहे. तेव्हा उन्हाळ्यात वांग्याची भाजी भरपूर खा.
कारल्यामध्ये कॅल्शियम, विटामिन सी, आयरन असतं. त्याच्या सेवनाने उन्हाळ्यात शरीर थंड राहातं.
उन्हाळ्याच्या दिवसांत पालक, मेथी, पुदिना यांसारख्या हिरव्या भाज्या खाणे शरीरासाठी फार फायद्याचे असते.
हिरवी, लाल आणि पिवळी शिमला मिर्च आरोग्यासाठी फार चांगली असते. उन्हाळ्यात हा डाएट एकदम बेस्ट आहे.
भारतात जवळपास प्रत्येक भाजीत टोमॅटोचा वापर होतो. उन्हाळ्यात तुम्ही याला सॅलेट म्हणूनही खाऊ शकता.
उन्हाळ्यात नारंगी रंगाचे गाजर बाजारात विकायला असतात. ते आरोग्यासाठी फार फायद्याचे असतात.
पिवळा भोपळा अँटीऑक्सिडंट्स आणि बीटा कॅरोटिनने भरपूर असतो. त्याने तुमचे शरीर थंड राहाते.