Sunday Upay : रविवारी हे उपाय करा, कधीही जाणवणार नाही पैशांची कमतरता

धनश्री भावसार-बगाडे

सुर्यदेवाला समर्पित

रविवार सुर्यदेवाला समर्पित वार असल्याने यादिवशी सूर्यपूजेला विशेष महत्व आहे.

Sunday Upay | esakal

ग्रहांचा राजा

सूर्याला ग्रहांचा राजा मानलं गेलं आहे. त्यामुळे दिवशी काही उपाय केल्याने कधीही पैशाची कमी भासत नाही असं मानलं जातं.

Sunday Upay | esakal

सूर्योदयाला अर्घ्य

रविवारी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्योदयाला अर्घ्य अर्पण करणे फार फलदायी ठरते. 'ओम सूर्याय नमः ओम वासुदेवाय नमः ओम आदित्य नमः' हे मंत्र यावेळी म्हणावे.

Sunday Upay | esakal

तुपाचा दिवा

रविवारी तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. यामुळे सूर्यदेवाबरोबर लक्ष्मीचीही कृपा राहते. घरात पैसा टिकत नसेल तर हा उपाय नक्की करा.

Sunday Upay | esakal

चंदनाचा टिळा

रविवारी घराबाहेर पडताना चंदनाचा टिळा लावून निघावं. असं म्हणतात की, चंदनाचा टिळा लावून निघाल्याने प्रत्येक कामात यश मिळतं.

Sunday Upay | esakal

लाल कपडे

रविवारी लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी लाल कपडे घालून सूर्याची पूजा करावी. अडचणी दूर होतात.

Sunday Upay | esakal

गुळ, तांदूळ

रविवारी गुळ आणि तांदूळ एकत्र करून वाहत्या पाण्यात अर्पण करावे. ज्योतिषशास्त्रानुसार असं केल्याने अडकलेली कामे मार्गी लागतात.

Sunday Upay | esakal

लक्ष्मी पूजा

या दिवशी सूर्याबरोबर लक्ष्मीचीही पूजा करावी. या दिवशी लक्ष्मीचा जप करणे फार उपयुक्त मानले जाते.

Sunday Upay | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunday Upay | esakal