बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने कोर्ट मॅरेज केले आहे.
स्वरा भास्करच्या लग्नाची माहिती समोर येताच सर्वांनाच धक्का बसला.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे.
स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे विद्यार्थी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.
त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस स्टुडंट युनियनचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे.
पुढील महिन्यात स्वरा बॉलीवूड स्टाईलमध्ये धूमधडाक्यात लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.