प्रणाली मोरे
स्वरा भास्करनं रजिस्टर मॅरेज केल्यानंतर आता हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पद्धतीनं लग्न केल्याचं समोर आलं आहे.
स्वरा जसं नेहमी तिच्या पोस्टमुळे ट्रोल होताना दिसते तसं आता लग्नानंतरही ती ट्रोल होताना दिसते आहे.
स्वरा भास्करनं समाजवादी पार्टीचा नेता फहद अहमद सोबत लग्न केलं आहे.
स्वरानं आपल्या कव्वाली नाईटचे काही फोटो शेअर केले जे जोरदार ट्रोल होताना दिसत आहेत.
हिरव्या रंगाच्या सूटमध्ये खरंतर स्वरा खूपच सुंदर दिसत आहे.
अनेकांनी तिच्या साध्या-सोज्वळ दिसण्याचं कौतूक केलंय पण काहींनी मात्र तिला 'बुरखा कुठेय तुझा..' म्हणत चांगलच सुनावलं आहे.
स्वरा भास्करनं मात्र आपल्या ट्रोलिंगवर अद्यापतरी पलटवार केलेला नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.