सूर्याचा जलवा! आता मोडणार बाबरचं 'हे' रेकॉर्ड

| Sakal

टी-२० वर्ल्डकपमध्ये लागोपाठ दोन सामने जिंकल्यानंतर भारताला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरोधात पराभव स्विकारावा लागला आहे.

| Sakal

या सामन्यात सूर्यकुमार सोडून या सामन्यात कोणत्याही भारतीय फलंदाजाला समाधानकारक धावा करता आलेल्या नाहीत. त्याने ४० बॉलमध्ये ६८ धावा केल्या.

| Sakal

यानंतर तो आता टी २० मध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

| Sakal

सूर्याने त्याच्या टी-२० करिअरमध्ये आतापर्यंत ३७ टी-२० इंटरनॅशनल मॅच खेळल्या आहेत.

| Sakal

या यादीत पहिल्या स्थानावर पाकचा मोहम्मद रिझवान असून त्याने २०२१ मध्ये ७३.६६ च्या सरासरीने १३२६ धावा केल्या होत्या.

| Sakal

तर दुसऱ्या स्थानावर पाकचा कर्णधार बाबर आझम आहे, त्याने २०२१ मध्ये एकूण ९३९ धावा केल्या आहेत.

| Sakal

सूर्यकुमार जर पुढच्या सामन्यात बांग्लादेशविरोधात पाच धावा करू शकला तर तो बाबरला मागे टाकेल.

| Sakal

सूर्याने वनडे करिअरमध्ये आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३४० धावा केल्या आहेत.

| Sakal