Makhana Chaat Recipe : तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत चाट, खातच राहाल

साक्षी राऊत

चटपटीत मखाना चाट बनवण्यासाठी १ कप मखाना, १ कप दही, १ उकळलेला बटाटा, टोमॅट, काकडी आमि १/4 टीस्पून काळी मिरी, हिरवी कोथिंबीर, चिंचेची चटनी, लिंबाचा रस आणि मीठ लागेल.

Makahana Chaat Recipe

मखाना चाट बनवण्यासाठी आधी बटाटे उकळा. बटाटे सोलून त्याचे तुकडे करा.

Makahana Chaat Recipe

यानंतर टोमॅटो,काकडी,हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.

Makahana Chaat Recipe

आता एका भांड्यात दही घेऊन चांगले मळून घ्या. दही ढवळत असताना ते हलकेच राहावे. दह्यामध्ये गरज असल्यास थोडे पाणी टाका.

Makahana Chaat Recipe

आता एका पातेल्यात बटर टाकून मखाना चांगले भाजून घ्या. सोनेरी झालेत की काढून थंड होऊ द्या.

Makahana Chaat Recipe

मिक्सिंग बाऊलमध्ये मखान्यासह सगळे चिरलेले पदार्थ मिक्स करून घ्या.

Makahana Chaat Recipe

या मिश्रणात वरून मिरी पावडर, चिंचेची चटनी आणि चवीनुसार मीठ घाला. तुमची चटपटीत चाट तयार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Makahana Chaat Recipe