बाळासाहेबांनंतरचा शिवसेनेचा आक्रमक चेहरा तेजस ठाकरे?

| Sakal

शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचे दुसरे पुत्र तेजस ठाकरेही आता राजकीय रणांगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

| Sakal

त्यांच्या राजकीय प्रवेशाचे संकेत बाळासाहेब ठाकरेंनी काही वर्षांपूर्वीच दिले होते.

| Sakal

जेव्हा आदित्य ठाकरेंचा राजकारणात अधिकृत प्रवेश झाला होता, त्यावेळचं बाळासाहेब ठाकरेंचं भाषण सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

| Sakal

त्या व्हिडीओमध्ये तेजस आपल्यासारखाच असल्याचा उल्लेख बाळासाहेब ठाकरेंनी केला होता.

| Sakal

त्यांनी म्हटलं होतं की, आदित्य हा शांत आणि संयमी स्वभावाचा आहे. पण तेजस हा माझ्यासारखा आहे. त्याची सेना ही तोडफोड सेना असेल."

| Sakal

या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणतात की, उद्धवचा दुसरा मुलगा तेजस अगदी माझ्यासारखा आहे. मला प्राणी आवडतात, त्यालाही प्राणी आवडतात.

| Sakal

एकदा तेजस मला म्हणाला की, मला तुमची सेना वगैरे काही आवडत नाही. मी माझी सेना काढलीये. मी म्हटलं काय बाबा, कोणती सेना काढलीस, त्यावर तो म्हणे तोडफोड सेना. त्याचं त्यानंच नाव ठरवलं आणि तो एकटाच असतो.

| Sakal

शिवसेनेच्या बाबतीत आत्ता संघर्षाचा आणि अटीतटीचा काळ सध्या सुरू आहे. या काळात आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करतायत, शिवसैनिकांना बांधून ठेवायचा प्रयत्न करतायत.

| Sakal

त्यातच आता आपल्या परिवाराची साथ द्यायला जीवशास्त्रात रमणारे तेजस ठाकरेही उतरणार असल्याच्या चर्चा आहेत.

| Sakal

बाळासाहेब ठाकरेंच्या या जुन्या व्हिडीओमुळे या चर्चांना हवा मिळत आहे.

| Sakal