पर्यटन स्थळी गेल्यावर तेथे राहण्याचा खर्च अनेकदा परवडण्यासारखा नसतो. पण भारतात अशी काही ठिकाणे आहेत जेथे राहण्याची मोफत सोय उपलब्ध आहे.
उत्तराखंडमध्ये गेलात तर गोविंद घाट गुरुद्वारा येथे राहण्या-खाण्याची मोफत सुविधा आहे.
गुजरातमधील गुरुद्वारा भाई मोहकम सिंह जी येथे राहण्या-खाण्याची मोफत व्यवस्था आहे. तसेच येथे राहिल्यास तुम्ही द्वारका पाहू शकता.
ऋषिकेशमधील गीता भवन येथे मोफत निवासासाठी १००० खोल्या आहेत.
हिमाचलला राहायला गेलात तर मणिकरण साहिब गुरुद्वारा येथे राहू शकता.
कोइम्बतूरपासून ४० किमी अंतरावर असलेल्या ईशा फाऊंडेशनमध्ये मोफत निवासाची सोय आहे.
सारनाथमध्ये फिरायचे असल्यास तिबेटी बुद्धिस्ट मोनेस्ट्री येथे ५० रुपयांत राहण्याची सोय होते.
निवासाची सोय मोफत झाल्यामुळे तुमचा पर्यटनाचा एकूण खर्च कमी होईल.